संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

दारूकांडानंतर गुजरातमध्ये पोलिसांची दारू पार्टी उघड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वलसाड- गुजरातच्या बोटादमध्ये विषारी दारू पिऊन 37 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुजरातच्या वलसाड मध्ये 3 पोलीस अधिकार्‍यांनी दारू पार्टी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तिघांना आता निलंबित करण्यात आले आहे.

वलसाड जिल्ह्याच्या अतुल येथे एक पोलीस उपनिरीक्षक आणि 3 पोलीस कॉन्स्टेबल अशा चौघांनी दारूची पार्टी आयोजित केली होती या दारू पार्टीला त्यांचे काही मित्रही होते. दरम्यान बोटेड दारू कांडानंतर ठिकठिकाणी छापेमारी सुरु आहे . त्यामुळे पोलिसांच्या या दारुपार्टीची खबर छापेमारी करणार्‍या पोलिसांना लागताच त्यांनी घटनास्थळी धड टाकली आणि या पार्टीत सामील असलेल्या चार पोलीस कर्मचार्‍यांसह 19 जणांना ताब्यात घेतले. दरम्यान त्या चारही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. गुजरातमध्ये एवढे मोठे दारूकांड घडल्यानंतरही खुद्द पोलिसवालेच दारुपार्टी करीत असल्याचे समजताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान गुजरात दारूकांडातील मृतांची संख्या आता 38न झाली असून या प्रकरणी आता पर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे.
गुजरात मध्ये दारूबंदी असतानाही गेल्या दोन वंशात गुजरातमध्ये 215 कोटी 62 लेखा 2 हजारांची विदेशी दारू जप्त करण्यात आली होती आणि हि माहिती खुद्द सरकारनेच विधानसभेत दिली होती त्यामुळे गुजरातमधील दारूबंदीची पोलखोल झाली आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami