संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

दावा न केलेले ४८ हजार २६२कोटी रुपये बँकांमध्येच पडून

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*आरबीआयचा अहवाल

नवी दिल्ली – देशातील बँकांमध्ये ४८ हजार २६२ कोटी अनक्लेम्ड म्हणजे कोणीही दावा न केलेले पैसे पडून आहेत, अशी धक्कादायक माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात दिली आहे. महाराष्ट्रासह ८ राज्यांमध्ये अशी सर्वाधिक रक्कम पडून आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३९ हजार २६४ कोटी अनक्लेम्ड होते. ते २०२१-२२ मध्ये ४८ हजार २६२ कोटींपर्यंत वाढले. त्यामुळे आरबीआयने या रकमेच्या मालकांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आरबीआयच्या नियमानुसार एखाद्या ग्राहकाने त्याच्या खात्यातून सलग १० वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार केला नाही, तर त्या खात्यातील जमा रक्कम दावा न केलेली अनक्लेम्ड होते. व्यवहार होत नसलेले खाते निष्क्रिय होते. त्यात बचत, चालू, मुदत ठेवी आणि रिकरिंग खात्यांचा समावेश असतो. ही अनक्लेम्ड रक्कम आरबीआयच्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये जमा होते. अशा प्रकारची रक्कम महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, बंगाल, गुजरात, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे आरबीआयने या ठेवीदारांचा शोध घेण्याची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. खातेदाराचा मृत्यू, कुटुंबातील सदस्यांना मृत व्यक्तीच्या खात्याबद्दल माहिती नसणे, चुकीचा किंवा बदललेला पत्ता, खात्यात नॉमिनीची नोंदणी केलेली नसणे अशी अनेक कारणे या अनक्लेम्ड रकमेची आहेत. कोणीही दावा न केलेल्या ठेवींची माहिती बँकेच्या वेबसाईटवर असते. खातेदाराचा पॅन कार्ड क्रमांक, जन्मतारीख, नाव आणि पत्ता यावरून त्याची माहिती मिळू शकते, असे आरबीआयने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami