संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

दिल्लीत पुढील 5 वर्षात 20 लाख नोकर्‍या देणार! केजरीवालांची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीत पुढील 5 वर्षात 20 लाख नोकर्‍या दिल्या जाणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. याचबरोबर दिल्लीला फूड हब बनवण्यात येणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आज बेरोजगारीची गंभीर समस्या आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या सरकारने 12 ते 13 लाख तरुणांना रोजगार दिला. त्याचबरोबर पुढील 5 वर्षात किमान 20 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. दिल्ली ही भारताची अन्नधान्याची राजधानी मानली जाते. जगभरातील सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ दिल्लीत उपलब्ध आहेत. कुठे तिबेटी, कुठे चायनीज, कुठलेही पदार्थ खायला मिळतात. आता त्यांचा विकास करण्याचा सरकारचा विचार आहे, जेणेकरून रोजगार निर्मिती होईल, असेही केजरीवाल यांनी सांगितले. पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की, आम्ही भौतिक पायाभूत सुविधा उपलब्ध करूआणि त्यानंतर अन्न सुरक्षेची व्यवस्था करू. यासोबतच फूड हबचे ब्रँडिंग केले जाईल, जेणेकरून देशातून आणि जगातून लोक येऊ शकतील. आम्हाला आशा आहे की, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. पहिल्या टप्प्यात आम्ही दोन फूड हब तयार करणार आहोत. एक म्हणजे मजनू का टिळा आणि दुसरे चांदनी चौक या ठिकाणी फूड हब तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami