मुंबई – दिवा-पेण-दिवा मार्गावर मेमू गाड्यांच्या आणखी फेर्या वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या मार्गावर येत्या 5 जुलैपासून चार फेर्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी दिली आहे.
कोरोनाकाळात दिवा-पेण-दिवा मेमू गाड्यांची सेवा बंद होती. कमी झालेली रुग्णसंख्या आणि शिथिल झालेले निर्बंध लक्षात घेऊन ऑक्टोबर 2021 पासून या मार्गावर चार मेमू गाड्यांच्या फेर्या सुरू करण्यात आल्या होत्या. आता आणखी चार फेर्यांची त्यात भर पडली आहे. शनिवार, रविवार वगळता उर्वरित पाच दिवस मेमू धावणार आहे. दिव्याहून पनवेलसाठी सकाळी 9.40 वाजता, पेणहून दिव्यासाठी सकाळी पावणेसात वाजता, दिव्याहून पेणसाठी रात्री 7.50 वाजता आणि पेणहून दिव्यासाठी सायंकाळी 6.05 वाजता गाडी सोडण्यात येणार आहे. दातिवली, निळजे, तळोजे पाचंद, नावाडे रोड, कळंबोली रोड, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटे, जिते, हमरापूर येथे या गाड्यांना थांबा असेल. या गाड्या बारा डब्यांच्या असतील.