संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या सेतू अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- राज्यातील शिक्षण विभागाने दुसरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रमाची रचना केली आहे.कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान या सेतू अभ्यासक्रमातून भरून काढले जाणार आहे.त्यासाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सेतू अभ्यासक्रम घेतला जाणार असून त्यांच्या अंमलबजावणीवेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

यात यात दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्याचे मराठी,गणित,विज्ञान,सामाजिक शास्त्र या विषयांवर भर देण्यात येणार आहे.या विषयांची उजळणी घेण्यात येणार आहे.तसेच इयत्ता आणि विषयानुसार महत्वाच्या क्षमतांवर अभ्यास घेतला जाईल.सेतू अभ्यासक्रमात रोजच्या वर्कबुकचा समावेश असणार आहे.शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंमअध्ययनावर भर दिला जाईल.यात पूर्व आणि उत्तर चाचणीचा समावेश असेल.या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असणार आहे.राज्यातील शाळांची पूर्वचाचणी १७ आणि १८ जून रोजी आणि विदर्भातील शाळांची पूर्व चाचणी १ आणि २ जुलै रोजी घेतली जाणार आहे.तर उत्तर चाचणी २५ ते २६ जून आणि विदर्भातील उत्तर चाचणी ८ ते १० ऑगस्ट रोजी तसेच अभ्यासक्रम २० जून ते २३ जुलै आणि विदर्भासाठी ४ जुलै ते ६ ऑगस्ट असा घेतला जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami