मुरबाड- मुरबाड शहरालगत असलेल्या देवगाव गावात काही मागील पाच वर्षांपूर्वी 45 लाख रुपये खर्चून नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र आजपर्यंत या नळपाणी योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा हा गढूळ व अशुद्ध असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा शुद्ध पाणी पुरवठा व्हावा याची मागणी केली. मात्र याबाबत कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते किंवा खासगी बोअरवेल असणार्या नागरिकांकडून पाणी विकत घ्यावे लागते.
अनेक खासगी बोअरवेल ह्या शेतघराच्या योजनेतून घेतल्याचे सांगितले जाते. नुकतेच मुरबाड नगरपंचायतचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी मुरबाड नगरपंचायत माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा देणार, अशी घोषणा केली. मात्र त्यासाठी किती कालावधी लागेल हे मात्र नक्की नसल्याने आणखी किती काळ पाण्यासाठी वणवण भटकावे लागते हा प्रश्न प्रलंबित आहे, देवगाव हे मुरबाड शहर व राष्ट्रीय महामार्ग लगत आहे. असून राष्ट्रीय महामार्ग ते गावाला जोडणार्या रस्त्यांवर साधी रोडलाईट नसल्यानें शहरा लगत गाव असूनही आज ही प्राथमिक सुविधांचा वणवा दिसत आहे सध्या तालुक्यांत थंडी ताप , सर्दी खोकला , टायफाईड, मलेरिया सारख्या आजाराचे रूग्ण आढळत असून पिण्या योग्य पाणी मिळत नसल्याने देवगाव ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.