नवी दिल्ली – देशात मंकीपॉक्सची लागण झालेल्यांची संख्या आता आठ झाली आहे. आजच केरळमध्ये एका ३० वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. आतापर्यंत केरळमध्ये एकूण पाच रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीत राहणाऱ्या आणखी एका नायजेरियन व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिल्लीत मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 3 झाली आहे.
३१ वर्षीय नायजेरियन व्यक्तीला मंगळवारी संसर्ग झाल्यानंतर लोक नायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. रुग्णाचा परदेश प्रवासाचा इतिहास नाही. सध्या भारतात मंकीपॉक्सची आठ रुग्ण आढळून आले आज मंगळवारी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.