नवी दिल्ली – देशात गेले काही दिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. शनिवारी दिवसभरात 8 हजार 582 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशात आतापर्यंत पाच लाख 24 हजार 761 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर शनिवारी 4 हजार 435 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली असून सध्या एकूण 44 हजार 513 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढली असून चौथ्या लाटेबाबत भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2 हजार 922 नव्या रुग्णांची भर पडली, तर 1 हजार 392 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरातील असून मुंबईत 1 हजार 745 कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच राजधानी दिल्लीत 795 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.