संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

देशातील १८ वर्षांवरील सर्वांना बुस्टर डोस फ्री

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गात नव्याने वाढ होत असतानां, सरकारने नागरिकांना कोविड लसीचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना पुढील ७५ दिवसांसाठी बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. १५ जुलैपासून यासाठी पुढील मोहीम सुरु होणार आहे. दरम्यान, देशभरात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भारतात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० पेक्षा जास्त वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत बुस्टर डोस दिला जात आहे. ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल ती व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. यांना सरकारी लसीकरण केंद्रावर हे डोस उपलब्ध आहेत. तसेच खासगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस दिले जात आहेत. तिथेही नागरिकांना पैसे मोजण्याची गरज नाही. १५ जुलैपासून १८+ सर्वांना मोफत बुस्टर डोस मिळेल. त्यासाठी त्यांना जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करु शकतात. अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोना लशीच्या दुसऱ्या डोसनंतर शरीरात तयार झालेली इम्युनिटी काही महिन्यांनंतर कमी होते. त्यामुळे ही इम्युनिटी पुन्हा तयार करण्यासाठी तिसऱ्या डोसची गरज असते. कित्येक देशांमध्ये हा डोस बूस्टर डोस म्हणून दिला जातो. भारतात याला ‘बूस्टर डोस’ न म्हणता ‘प्रिकॉशन डोस’, म्हणजेच खबरदारीचा डोस म्हटलं जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami