संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

देशात आढळला जगातला दुर्मीळ रक्तगट, ‘ईएमएम निगेटिव्ह’

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – भारतात पहिल्यांदाच जगातील दुर्मीळ असा रक्तगट आढळला आहे. गुजरातमधील एका ६५ वर्षीय हृदयविकाराच्या रुग्णाचा हा रक्तगट असून ‘ईएमएम निगेटिव्ह’ अशी त्याची ओळख आहे. मुख्य म्हणजे हा रक्तगट असलेली व्यक्ती ना कोणाला रक्त देऊ शकते ना कोणाकडून रक्त घेऊ शकते.

साधारणपणे मानवी शरीरात चार रक्तगट आढळून येतात ए, बी, ओ आणि एबी. मात्र रक्तात ईएमएमचे प्रमाण कमी असल्यास या रक्तगट प्रकाराला ईएमएम निगेटिव्ह असे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत या रक्तगटाचे ९ लोक सापडले होते. त्यात आता भारतातील दहाव्या व्यक्तीचा समावेश झाला आहे.

समर्पण रक्तदान केंद्राचे प्रमुख सन्मुख जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय रुग्णावर हृदयविकारासाठीचे उपचार सुरू आहेत. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला रक्ताची गरज होती. मात्र त्याला लागणारे रक्त कुठेच मिळत नव्हते. तपासणीनंतर आढळले की त्याचे रक्त कोणत्याही रक्तगटाशी जुळत नाही. त्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने अमेरिकेत पाठवण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami