संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

देशात २४ तासांत २०,०३८ नवे कोरोना रुग्ण; ४७ जणांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी ८ वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या २४ तासांत २० हजार ०३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ४७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच १६ हजार ९९४ जण कोरोनातून बरे झाले. यासह देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या ५ लाख २५ हजार ६०४ इतकी झाली आहे. तर, ४ कोटी ३० लाख भ ५ हजार ३५० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, भारतात सध्या १ लाख ३९ हजार ०७३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, काल (गुरुवार) देशात कोरोनाचे २० हजार १३९ नवीन रुग्ण आढळले होते, तर ३८ जणांचा मृत्यू झाला होता. तर, राज्यात काल कोरोनाच्या २ हजार २२९ नव्या रुग्णांची भर पडली आणि दिवसभरात एकूण २ हजार ५९४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यासह राज्यात आतापर्यंत ७८ लाख ४७ हजार ८९४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९५ टक्के इतके झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami