मुंबई – देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ७१४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, २,५१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांची आकडेवारी चार हजारांच्या घरात नोंदविली जात होती. त्यात आज काहिशी घट झाली. दरम्यान, देशात आतापर्यंत ५ लाख २४ हजार ७०८ इतक्या कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ४ कोटी २६ लाख ३३ हजार ३६५ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे, तर सध्या २६ हजार ९७६ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशासह राज्यातदेखील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. ‘जरी राज्यात मास्क सक्ती नसली तरी, आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वतःहून मास्क वापरावा’, असे टोपे म्हणाले. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ०३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर, ३७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या राज्यात ७ हजार ४२९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यातील सर्वाधिक ५ हजार २३८ रुग्ण हे एकट्या मुंबईत असून त्याखालोखाल ठाण्यात १ हजार १७२ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
#COVID19 | India reports 3,714 fresh cases, 2,513 recoveries, and 7 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) June 7, 2022
Total active cases are 26,976 pic.twitter.com/mZIs8dP73f