नवी दिल्ली – देशात दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख वाढत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,793 नवीन रुग्ण आढळले असून कोरोनामुळे 27 जणांचा मृत्यू झाला. आता देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 96,700 इतकी आहे. तर, 24 तासांत कोरोनाचे 9,486 रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होण्याचा आकडा 4,27,97,092 वर पोहोचला.
दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 197.31 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत देशात एकूण 86.14 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.