संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

द्रोपदी मुर्मूयांना शिवसेना पाठींबा देण्याचे संकेत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मूयांना शिवसेनेने पाठिंबा दिला तर त्याचा अर्थ हा पाठींबा भाजपाला दिला असा होत नाही असे म्हणत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत शिवसेनेचा द्रोपदी मुर्मूयांना यांना पाठींबा असल्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, शिवसेना ही नेहमी शिवसेना पक्षप्रमुख यांचे आदेश पाळले जात असतात. शिवसेनेत बैठक झाली. यावेळी खासदारांची मतं जाणून घेतली. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. द्रोपर्दी मुर्मू या आदिवासी आहे. त्या पहिल्या राष्ट्रपती होणार आहे. या संदर्भात काय निर्णय घ्यावा अशी चर्चा झाली. यशवंत सिन्हा हे विरोधीपक्षाचे उमेदवार आहे. त्यांच्याबद्दलही आमच्या सदभावना आहे. विरोधी पक्ष टिकावा अशी आमची भूमिका आहे. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. प्रतिभाताई या महाराष्ट्राच्या राष्ट्रपती होत्या. प्रणव मुखर्जी यांनाही आम्ही पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिवसेना ही एनडीएमध्ये होती. राष्ट्रपतिपदासाठी कुणाला पाठिंबा द्यायचा आहे, याबद्दल उद्धव ठाकरे हे लवकरच निर्णय घेतील. पक्षप्रमुख कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाही. ते एक दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करतील.खासदार विनायक राऊत यांनीही म्हटले आहे की, आदिवासी भगिनीला न्याय मिळावा अशी विनंती आम्ही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उयाना केले आहे.

खासदार हेमंत गोडसे यानी म्हटले आहे की, ,महाविकास आघाडी आणि भाजपा बरोबरची युती या दोघांचा अनुभव पाहता महाविकास आघाडीचा अनुभव चुकीचा आणि वाईट आहे. पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती बनणार आहेत. त्यांना पाठींबा द्यावा अशी विनंती सर्व खासदारानी काल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यावर लवकरच सकारात्मक विचार करू अशी ग्वाही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami