संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

धर्मवीरांचा घात झाला की अपघात?
ठाण्यामध्ये मनसेच्या बॅनरने खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादळाच्या परिस्थितीमध्ये आता शिवसेनेला डिवचण्यासाठी नेहमीप्रमाणे मनसेही सरसावलेली दिसत आहे. ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी महेश परशुराम कदम यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर एक बॅनर लावले आहे. त्यामध्ये त्यांनी आमच्या धर्मवीरांचा घात झाला की अपघात? याचा उलगडा झालाच पाहिजे, असा सवाल केला असून त्यांच्या या बॅनरमुळे ठाण्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.
26 ऑगस्ट 2001 रोजी नक्की आमच्या धर्मवीरांचे काय झाले? घात की अपघात? लवकरात लवकर ठाणेकरांना याचा उलगडा झालाच पाहिजे. असा आशय या बॅनरवर लिहिला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बोलताना, आनंद दिघेंसोबत जे घडले ते मला माहिती आहे, पण ते मी आजवर कुठेही बोललो नाही, त्यावर मी जर मुलाखत दिली तर भूकंप होईल. असे वक्तव्य केले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami