धुळे – केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार आणि राज्य पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘ हर घर झेंडा” हा उपक्रम राबविला जाणार आहे.तशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर आणि शासकीय व निमशासकीय आस्थापनाच्या इमारतीवर आपला तिरंगा राष्ट्रध्वज उभारला जाणार आहे.तसेच इतर विविध उपक्रमही राबवले जाणार आहेत.
या उपक्रमानुसार घरोघरी उभारला जाणारा राष्ट्रध्वज हा सुती ,लोकरी,रेशमी किंवा पॉलिस्टर व खादी कापडाचा असावा.भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात त्या स्मृती जाग्या व्हाव्यात आणि देशप्रेमाची भावना रुजली जावावी या हेतूने ही हर घर झेंडा ही संकल्पना केंद्र सरकारने पुढे आणली आहे.या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक घर,शाळा,कॉलेज,
रेशनिंग दुकान,दवाखाने आणि एसटी बस आगार तसेच सर्व पोलीस ठाणी आदींच्या इमारतींवर राष्ट्रध्वज उभारला जाणार आहे.त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना नुकत्याच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहेत.