संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार! आश्रमशाळेची विहीर चोरीला गेली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नंदुरबार- ‘जाऊ तिथं खाऊ’ हा मराठी चित्रपट ज्या कथेवर आधारित आहे. तशीच घटना चंद्रपूरमध्ये घडली. या तालुक्यातील ठाणेपाडा येथील टोलेजंग आश्रमशाळेच्या आवारातील विहीरच चक्क चोरीला गेली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने शाळेच्या आवारात ही विहीर खोदल्याचा कागदोपत्री दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र तेथे विहीरच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे आश्रमशाळेची भव्य इमारत आहे. तेथे ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. ते आश्रम शाळेच्या वसतीगृहात राहतात. या शाळेसाठी पाणीपुरवठा विभागाने विहीर खोदल्याचे कागदोपत्री दाखवले आहे. मात्र प्रत्यक्षात ती खोदलेलीच नाही. अधिकाऱ्यांनी कागदोपत्री हा दावा केला. त्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी अधिकाऱ्यांना विचारले असता ते निरुत्तर झाले. शेवटी विहीर नसल्याचे आणि प्रशासनाची चूक झाल्याचे त्यांनी कबुल केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami