नगरमध्ये भाजपला दुसरा धक्का! उपनगराध्यक्ष राऊत राष्ट्रवादीत

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

अहमदनगर- नगरपंचायत निवडणुकीच्या तोडांवर भाजपमधून राष्ट्रवादीत येणार्‍यांची संख्या वाढत असल्याने भाजपला हा मोठा धक्का मानता जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या जिल्हास्तरावरील निष्ठावान मानल्या गेलेल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. आता कर्जत नगरपंचायतीचे भाजपचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांनाही हा मोठा धक्का मानला जात आहे.

कर्जत शहरातील भाजपचे नेते, नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष आणि सध्याचे उपनराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आज भाजपमधील प्राथमिक सदस्यासह सर्व पदांचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

Close Bitnami banner
Bitnami