संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 20 August 2022

नमामि गंगे मोहिमवर वरुण गांधींचे टीकास्त्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमामि गंगे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर भाजपा खासदार वरुण गांधी यांनी केंद्र सरकारवरच टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, गंगा आपल्यासाठी फक्त नदी नाही तर ‘माँ’ आहे. माँ गंगा ही करोडो देशवासीयांच्या जीवनाचा, धर्माचा आणि अस्तित्वाचा आधार आहे. त्यामुळे नमामी गंगेसाठी 20 हजार कोटी रुपयांचे बजेट पास करण्यात आले होते. आतापर्यंत 11 हजार कोटी रुपये खर्च करूनही नदीचे प्रदूषण का होत आहे? असा सवाल वरुण गांधी यांनी विचारला आहे. ट्वीटमध्ये त्यांनी एक व्हिडिओही जोडला आहे.

या व्हिडिओमध्ये गंगेत मृत्युमूखी पडलेले मासे दाखवण्यात आले आहेत. ’गंगा ही जीवनदाता आहे, मग दूषित पाण्यामुळे मासे का मरतात? ही जबाबदारी कुणाची?’ असेही वरुण गांधींनी विचारले आहे.या आधीही वरुण गांधींनी आपल्या सरकारच्या योजनेवर सडकून टीका केली आहे. जीएसटी, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य करत आपल्या सरकारला घरचा आहेर दिला आहे. अग्निवीर या योजनेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami