संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

नवाब मलिक यांना जामीन नाही! 29 जुलै रोजी पुढील सुनावणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई-  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आजही निकाल लागला नाही. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका होऊ शकली नाही.गेल्या अनेक महिन्यांपासून मलिक तुरुंगात आहेत. आज मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी तहकूब झाली होऊन . याप्रकरणी 29 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणेला कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत म्हणून याप्रकरणात जामीन देण्यात यावा, असा दावा मलिकांच्या वतीने करण्यात आला होता. परंतु न्यायालयात ईडीने नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. आता मलिक यांच्या याचिकेवर विशेष कोर्टात पुढील सुनावणी 29 जुलै रोजी होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami