संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

नवीन भरतीच्या जाहिरातीमुळे कंत्राटी पोस्टमनांना नोकरी जाण्याची भीती !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पणजी – केंद्र सरकारकडून पोस्टमन पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने राज्यातील १६ वर्षापासून सेवा बजावत असलेल्या कंत्राटी पोस्टमनांना आपली नोकरी जाण्याची भीती वाटू लागली आहे.त्यांच्यामध्ये हतबलता निर्माण झाल्याने या प्रश्नावर राज्य सरकारने केंद्राशी चर्चा करून या पोस्टमन मंडळीना या संकटातून वाचवावे अशी मागणी गोव्यातील कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले की, कंत्राटी पदावरील या पोस्टमनांचा हा उदरनिर्वाहाचा प्रश्न असून मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहावे.नुकत्याच झालेल्या अधिवेशन काळात शून्य प्रहरात पोस्टमनांचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. आता तर केंद्राने जाहिरात प्रसिद्ध केल्याने या कर्मचाऱ्यांना खरोखरच आपली नोकरी जातेय की काय याची भीती वाटू लागली आहे.गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे या पोस्टमनांना सेवेतून कमी न करता कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी करण्यात आली होती.कारण गेली १६ वर्षे कंत्राटी कर्मचारी इमानेइतबारे आपली सेवा बजावीत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami