संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

नागपुरच्या पुरात ८ जण वाहून गेले! भुशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर : राज्यात यंदा जून महिन्यात दडी मारून बसलेला पाऊस जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात कोसळत आहे. नागपुरामध्ये पुराच्या पाण्यात ८ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सतरापूर आणि नांदा गावातील नाल्याला पूर आला आहे. या पाण्यातूनच गाडी नेण्याचं धाडस वाहन चालकाने केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. मात्र त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण ७५ टक्के भरले आहे. भुशी धरणात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

रायगडमध्ये गेल्या ५ दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी रायगडातील अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवस रायगडसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरडग्रस्त व नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच नदी पुलांच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरातील पहिली ते बारावीच्या सगळ्या शाळा बंद राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केले आहे. गोदावरी नदीला मोसमातील पहिला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलपाडा धरणातून दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.पालघर- जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथील नदीला मोठा पूर आल्यामुळे आठ गावांचा संपर्क तुटला आहे.नंदुरबार जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नवापूर शहरातील रंगावली काठावरील १०० घरातील ४०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. गडचिरोली-जिल्ह्यात १२ आणि १३ तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami