संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

नागपुरात स्वाईन फ्लूचं संकट! काळजी घेण्याचे आवाहन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर- नागपुरात कोरोनाचं संकट असताना आता व्हायरल तापासोबत स्वाईन फ्लूनंही टेन्शन वाढवलं आहे. राज्याच्या उपराजधानी स्वाईन फ्लूचेही रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 7 दिवसात नागपूरात 8 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंतच्या स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या 12च्यावर पोहोचली आहे.यापैकी काही रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे. उपराजधानीत कोरोनासह व्हायरल रुग्णांची संख्या वाढत असताना स्वाइन फ्लूचा वाढता प्रकोप आरोग्य विभागाच्या चिंता वाढवणारी आहे.

मुंबईतही स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. मुंबईत स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण आढळून आले आहेत. यातील चौघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. मुंबईत लेप्टो आणि स्वाईन फ्लूचा धोका वाढ होत असल्यानं महापालिकेनं तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणीहोत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने लेप्टो आणि डेंग्युच्या रूग्णांच्या संख्यात वाढ झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami