नागपूरची 50 रुग्णालये एकत्र येऊन उभारणार सामायिक ऑक्सिजन प्रकल्प

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

  • नागपूर – कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या 50 सदस्यांनी एकत्र येऊन बुटीबोरी येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प याच वर्षात सुरू होण्याची शक्यता असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अरबट यांनी व्यक्त केली आहे .तर या प्लांटमधून 150 रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती असोसिएशनचे डॉ.आलोक उमरे यांनी दिली.

  • कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 178 मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजनची मागणी वाढली होती. इतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वे व विमानाची सेवा घ्यावी लागली, परंतु रुग्णसंख्येचा उच्चांक महिन्याभरातच कमी झाल्याने मोठा धोका टळला. मात्र यापुढे ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये, म्हणून न्यायालयाने 50 व त्यापेक्षा जास्त खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांना स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे निर्देश दिले. परंतु, जागेची कमतरता व अनेक खासगी रुग्णालयांना स्वत:चे प्लांट उभारणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी व्हीएचए अर्थात ‘विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन’च्या सदस्यांनी एकत्र येऊन बुटीबोरी एमआयडीसी येथे ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया’च्या मदतीने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात ‘व्हीएचए’चे समन्वयक डॉ. बी. के. मुरली यांनी सांगितले की,या प्रकल्पासाठी बुटीबोरी एमआयडीसीमध्ये तीन एकरची जागा उपलब्ध झाली असून त्यासाठी ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया’कडे प्रस्ताव सादर केला आहे.तसेच ऑक्सिजन प्लांटच्या एकूण खर्चाच्या 20 टक्के म्हणजेच अंदाजे 12.5 कोटी रुपये योगदान सदस्यांनी जमा केले आहे, तर ‘एमएसएमई’कडून उर्वरित 80 टक्के अनुदान मिळणार आहे. ‘व्हीएचए’चे डॉ. आलोक उमरे म्हणाले की, ऑक्सिजनचा शिल्लक साठा इतर रुग्णालयांना पुरवला जाईल. दररोज 1,700 जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची मदत या प्लांटमधून होणार आहे.
Close Bitnami banner
Bitnami