नाशिक – सटाणा-बागलाणच्या दोधेश्वर घाटात ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून भीषण अपघात झाला. त्यात दोधेश्वर अकादमीच्या एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर इतर ३५ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सटाणा आणि मालेगावच्या रुग्णालयात दाखल केले आहे. निलेश वनोरे असे या अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
श्रावणी सोमवारी दोधेश्वर शिवमंदिरात भरणाऱ्या यात्रेच्या बंदोबस्तासाठी दोधेश्वर अकादमीतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी गेले होते. तेथून ते ट्रॅक्टर ट्रॉलीतून परतत होते. त्यावेळी दोधेश्वर घाटात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॉली उलटून अपघात झाला. त्यात निलेश वनोरे याचा मृत्यू झाला. तर इतर ३० ते ३५ विद्यार्थी जखमी झाले. त्यांना सटाणा आणि मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.