संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 23 May 2022

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या फैसला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

मुंबई – संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जमीन अर्जावर उद्या सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जमीन मंजूर होणार की त्यांना अटक होणार? यावर न्यायालयात फैसले होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या वादातून संतोष परब या शिवसैनिकावर हल्ला झाला होता, या प्रकरणी जखमी संतोष परब यांच्या जबानीवरून नितेश राणे यांच्या विरुद्ध कलम ३०७,१२० [बी] ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून नितेश राणे गायब होते. मात्र या प्रकरणातील इतर पाच आरोपींना अटक झाली होती. दरम्यान सत्र न्यायालयात नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सलग तीन दिवस सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला. त्यामुळे नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील नितीन प्रधान यांनी राणेंच्या बाजूने युक्तिवाद करताना नितेश राणे यांना राजकीय हेतूने यात गुंतवण्यात आल्याचे सांगितले. तर नितेश राणे यांच्या विरुद्ध आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

दरम्यान उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत नितेश राणेंना अटक करू नये असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे १५ दिवसानंतर नितेश राणे सिंधदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकांच्या सत्काराला हजर राहिले होते. तर त्यांच्या जमीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालय नितेश राणे यांच्या अटकपूर्व जमीन अर्जावर निकाल देणार आहे. त्यामुळे नितेश राणेंना अटकपूर्व जामीन मिळणार की अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami