संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

निर्यात करारानंतरही रशियाचा युक्रेनच्या ओडेसा बंदरावर हल्ला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ओडेसा- गेल्या 5 महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. यात युक्रेनियन शहरे उध्वस्त झाली आहेत. युद्धामुळे निर्माण झालेल्या अन्न संकटातून जगाला बाहेर काढण्यासाठी रशिया-युक्रेनने 23 जुलै रोजी धान्य निर्यात करारावर स्वाक्षरी केली. मात्र 12 तासांनंतर रशियन सैन्याने ओडेसा येथील बंदरावर जोरदार हल्ला केला.

करारानुसार रशियन सैन्य युक्रेनच्या बंदरांवर हल्ला करणार नाही, असे ठरले होते. असे असतानाही रशियाने ओडेसा बंदरावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. युक्रेन हा जगातील सर्वात मोठा गव्हाचा निर्यातदार देश आहे. गव्हा व्यतिरिक्त, युक्रेन धान्य, तेल आणि बियाणे देखील निर्यात करतो. ओडेसा बंदर शहरातून मालवाहतूक केली जाते. रशियाने काळ्या समुद्रावरील बंदर शहरे रोखली होती. धान्य निर्यात करारानंतर काळ्या समुद्रातून धान्याची निर्यात पुन्हा सुरू झाली. धान्य भरले जात असतानाच क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी याला रशियाचा रानटीपणा म्हटले आहे. ते म्हणाले की, रशियावर विश्वास ठेवता येणार नाही. रशिया दिलेली आश्वासने पाळली नाहीत याचा हा पुरावा आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami