नाशिक – प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते सव्वा किलो सोन्याच्या कळस निवृत्तीनाथ मंदिरावर प्रतिष्ठा करुन बसविण्यात आला.हा कळस लोकवर्गणीतून बनवण्यात आला आहे. या सोहळ्यादरम्यान भाविकांमध्ये कामालीचा उत्साह पाहायला मिळाला आणि संपूर्ण मंदिर परिसर निवृत्तीनाथांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. यावेळी खासदार हेमंत गोडसे, बंडा तात्या कर्हाड, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, श्वस्त दिप्ते, गंभीरे, पोलिस निरीक्षक रणदिवे व पालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव व नामवंत कीर्तनकार आणि पुजक जयंत महाराज गोसावी यांसह मोठ्या संख्येने वारकरी विविध संस्था आणि दिंड्यांचे प्रमुख, प्रतिनिधी व निवृत्तीनाथ समाधी मंदिराचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.