मुंबई – शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत राहिलेल्या निष्ठावान 15 आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज धन्यवाद मानण्यासाठी भावनिक पत्र पाठवले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत राहत निष्ठेचे पालन केले असल्याचे ते या पत्रात म्हणाले आहे. या पत्रात ते म्हणाले आहे की, शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती आपल्याला बाळासाहेबांनी शिकवली आहे. आईच्या दुधाशी बेईमानी करू नका हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत राहत निष्ठेचे पालन केले आहे. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिलेत. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना असे पत्रात
म्हटलं आहे.