नवी दिल्ली – अडीच वर्षांपूर्वी जागतिक स्तरावर आलेल्या कोविडमुळे वर्क फ्रॉम होमच्या प्रथेला सुरुवात झाली. या प्रथेने अनेक कंपन्यांना विचार करायला भाग पाडले आहे की, कर्मचारी कार्यालयात येत नसले तरी ते पूर्ण प्रामाणिकपणे चांगले काम करत आहेत. त्यामुळे आता नेदरलँड्समध्ये कर्मचार्यांना लवकरच घरून काम करण्याचे कायदेशीर अधिकारेषा स्वातंत्र्य मिळणार आहे. डच संसदेने याला मंजुरी दिली आहे, ज्याला लवकरच डच सिनेटची मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचेही समोर आले आहे.
विशेषतः येथील अनेक भारतीय समुदायातील लोकांना खूप आनंद झाला आहे की, आता वर्क फ्रॉम होम येथे कायदेशीर अधिकाराच्या कक्षेत समावेश करण्यात आले आहे. म्हणजेच, येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची कोणतीही सक्ती राहणार नाही, ते त्यांच्या घरी किंवा इतरत्र कुठेही बसून त्यांचे कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे करू शकतील. कार्यालयातील कोणतेही काम कार्यालयात न येता पूर्ण करता येत असल्यास घरून काम करण्याची कर्मचाऱ्याची विनंती कोणताही अधिकारी नाकारू शकत नाही. मात्र, ज्या जबाबदाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची सक्ती केली जाईल किंवा कार्यालयात येणे गरजेचे असल्यास त्यांना या कायद्याच्या कक्षेत ठेवण्यात येणार नाही.
हे विधेयक नेदरलँडच्या संसदेत अशा वेळी आले आहे जेव्हा जगभरातील इतर कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत बोलवत आहेत. टेस्लाचे मालक एलन मस्क यांचे उदाहरण आहे. ज्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत या किंवा कंपनी सोडा, असे आदेशच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नेदरलँडमध्ये कर्मचारी कार्यालयात येत नसले तरी ते पूर्ण प्रामाणिकपणे चांगले काम करत आहेत. मग अशा स्थितीत त्यांचे कार्यालयात येणे बंधनकारक का करावे? असा विचार समोर आला आहे. कंपन्यांसाठी हा तोट्याचा सौदा नाही. तसेच कर्मचारीदेखील या मार्गाने अधिक समाधानी आहेत. त्यामुळे वर्क फ्रॉम होमला आता कायदेशीर अधिकार देण्याचा निर्णय नेदरलँडमध्ये घेण्यात आला आहे.