संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळावे म्हणून महिला पदाधिकाऱ्यांची पायी दिंडी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड – महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या नव्या सरकारने विधानसभेत बहुमत देखील सिद्ध केले. नव्या सरकारमध्ये कोणाला किती खाती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नवनिर्वाचित सरकारमधील मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळावे. यासाठी आता बीडमधील भाजप महिला आघाडीच्या वतीने, बीड ते मोहटादेवी पायी दिंडी काढण्यात आली आहे.

आज सकाळी या दिंडीला सुरुवात झाली असून बीड- शिरूर कासार – मोहटादेवी अशी पायी दिंडी काढण्यात येत आहे.दरम्यान आम्हाला विश्वास आहे, या सरकारमध्ये नक्कीच पंकजा ताईंना मंत्रिपद मिळेल. आणि हीच भावना घेऊन साकड घालण्यासाठी, आम्ही बीडहून मोहटा देवीला पायी दिंडीच्या माध्यमातून जात आहोत. असे प्रतिक्रिया बीडच्या भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा संगीता धसे यांनी दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami