चंदिगड – विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आजपासून 300 युनिट मोफत वीज देण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा राज्यातील सामान्य नागरिकांना होणार आहे. घरगुती ग्राहकांना ही मोफत वीज दिली जाणार आहे. पूर्वीच्या पंजाबमधील सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नव्हती. मात्र आमच्या सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासने एक वर्षाच्या आत पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आजपासून 300 युनिट मोफत वीज देण्यास सुरुवात केली आहे. घरगुती वापराच्या ग्राहकांसाठी ही योजना आहे. दिल्लीनंतर मोफत वीज देणारे पंजाब हे देशातील दुसरे राज्य बनले आहे.