संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

पंतप्रधानांच्या उपस्थितीत पहिली I2U2 शिखर परिषद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- भारत, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या चार देशाची I2U2 ची पहिली शिखर परिषद व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या 12U2 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेला इस्रायलचे पंतप्रधान, यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे देखील उपस्थित राहणार आहेत. युक्रेन संघर्षामुळे निर्माण झालेले जागतिक अन्न आणि ऊर्जा संकट या मुद्यावर परिषदेच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन 14 जुलै रोजी इस्रायल दौऱ्यावर असताना या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या समुहाला शिखर परिषदेसाठी I2U2 असे नाव देण्यात आले आहे.ज्यामध्ये ‘I’म्हणजे भारत आणि इस्रायल तर ‘U’म्हणजे अमेरिका आणि संयुक्त अरब अमिराती.विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 13 ते 16 जुलै या कालावधीत पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर असणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami