संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

पंतप्रधान झालो तर सर्वप्रथम चीनवर कठोर कारवाई करेन – ऋषी सुनक यांचा ड्रॅगनला इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये नवीन पंतप्रधानपदासाठी निवडणूक होत असून मतदानाचा शेवटचा टप्पा बाकी आहे. ज्यामध्ये सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे दोन उमेदवार ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात लढत आहे. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक ऋषी सुनक हे या शर्यतीत आघाडीवर आहेत. दरम्यान, आपण ब्रिटनचे पंतप्रधान झालो तर चीनविरोधात कठोर धोरण स्वीकारू अशी ऋषी सुनक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ऋषी सुनक यांनी चीनला केवळ ब्रिटनसाठीच नाही तर जगासाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची जागा घेण्याच्या शर्यतीत असलेल्या सुनकवर त्यांचे प्रतिस्पर्धी लिझ ट्रस यांनी चीन आणि रशियाबाबत त्यांचे धोरण मवाळ असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर सुनक यांनी आपली कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे अधिकृत ग्लोबल टाइम्सने यापूर्वी सांगितले होते की यूके-चीन संबंध विकसित करण्यासाठी स्पष्ट आणि व्यावहारिक दृष्टीकोन घेणारा सुनक हा एकमेव उमेदवार आहे. मात्र आता सुनक यांनी केलेल्या या विधानामुळे चीनला मात्र हा मोठा धक्का आहे. तर दुसरीकडे ट्रसला पाठिंबा देणाऱ्या ब्रिटीश वृत्तपत्र डेली मेलने याबाबत सुनक यांच्यावर टीका केली आहे. मात्र, ऋषी सुनक यांनी चीनविरोधात एवढी कठोर पावले उचलण्याची घोषणा केली आहे, जी आतापर्यंत कोणीही केली नव्हती. त्यांनी आपल्या योजनांबद्दल स्पष्ट शब्दात सांगितले आणि ते म्हणाले की ते पंतप्रधान होताच ब्रिटनमध्ये चालणार्‍या सर्व ३० चीनी कन्फ्यूशियन संस्थांना टाळी लावतील. कारण चीन इतर देशांमध्ये आपली संस्कृती आणि भाषा पसरवण्यासाठी त्यांचा वापर करतो, त्यानंतर ते त्या देशात आपला प्रभाव प्रस्थापित करू लागतत्. एवढेच नाही तर त्यांनी ब्रिटनमधील शैक्षणिक संस्थांमध्ये चिनी निधीवर मर्यादा आणण्याबाबतही सांगितले आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांना केवळ ६० हजार डॉलर्सपर्यंतच सूट दिली जाईल असे सांगितले. यापेक्षा जास्त निधीसाठी त्यांना शासनाची परवानगी घ्यावी लागेल, जी ते देणार नाहीत. चीन ब्रिटीश तंत्रज्ञान चोरत असल्याचा आरोपही सुनक यांनी केला. तसेच चीनची जागतिक ‘बेल्ट अँड रोड’ ही योजना देशांना कर्जाच्या जाळ्यात अडकवणारी योजना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी चीनवर शिनजियांग आणि हाँगकाँगमध्ये आपल्याच लोकांचा छळ केल्याचा आरोप केला. त्यांनी तंत्रज्ञान कंपन्यांच्या चिनी अधिग्रहणांवर आणि धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील मालमत्तेवर बंदी घालण्याचा विचार केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami