संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

पती-पत्नीमध्ये तिसरी व्यक्ती हस्तक्षेप करू शकत नाही!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – विवाहित जोडप्यांचे संरक्षण करणे हा राज्याचा घटनात्मक अधिकार असून पती-पत्नी म्हणून राहणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये तिसरी व्यक्ती हस्तक्षेप करू शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमुर्ती तुषार राव गेडेला यांनी निकाल देताना म्हटले, ‘दोन व्यक्तींचा सहमतीने विवाह झाला असेल तर त्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. मग ते कोणत्याही जातीचे अथवा समुदायाचे असले तरीही.’

मिळालेल्या माहितीनुसार, एका पीडित महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिने सांगितले की, ‘घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे नातेवाईकांच्या आणि परिवाराच्या त्रासामुळे घर सोडून बाहेर राहावे लागत आहे.’ तसेच या महिलेचे वडील उत्तर प्रदेशातील मोठे राजकीय व्यक्ती आहेत. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने संबंधित महिला आणि तिच्या पतीला सुरक्षा देण्याचे आदेश दिले. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे धमकीचे फोन किंवा धोक्याची सूचना मिळाली तर आरोपींना ताबडतोब अटक करा, असे आदेशही दिले आहेत. पती-पत्नी म्हणून सोबत असणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले. त्याचबरोबर देशातील जोडप्यांचे रक्षण करण्याचे आदेश देण्याचे अधिकार राज्यांना आहेत, असेही न्यायालयाने सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami