संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

परतीच्या मार्गावरील गजानन महाराज पालखीचे जानेफळमध्ये भव्य स्वागत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बुलढाणा – पंढरपूर येथून आषाढीची वारी पूर्ण करून परतीच्या मार्गावर असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे जानेफळ नगरी येथे मोठ्या दिमाखात भव्य स्वागत करण्यात आले.संत श्री शेगावीचा राणा गजानन महाराजांची पालखी जानेफळ येथे हरिनामाच्या व टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात दाखल झाली होती.
श्रींच्या पालखीच्या दर्शनासाठी परीसरातील भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती.चौकाचौकात फटाक्याची आतिषबाजी रांगोळी काढून चहा,लाडू, बिस्किटे,नास्ता पाणी वारकऱ्यांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. संपूर्ण चौकात चौकात जानेफळ श्रींच्या पालखी साठी दारामध्ये आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्रींची पालखीची मुक्कामाची व्यवस्था ही सरस्वती महाविद्यालयात करण्यात आली.जानेफळ ग्रामपंचायत सरपंच विश्वनाथ हिवराळे, उपसरपंच गणेश पाखरे, ग्रा.प. सदस्य,गावकरी यांनी श्रीची महाआरती करून पूजन केले.जानेफळ ग्रामपंचायत सदस्य, भाविक भक्त यांच्या सुयोग्य नियोजनात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती,ब्रम्हांडनायक ग्रुपने वारकऱ्यांना भोजन स्थळी बिसलेरी बॉटलचे वाटप केले,ब्रह्मांड सेवा अकॅडमी वारकऱ्यांच्या पायाची मालिश करून अमुल्य सेवा देण्यात आली.काल मुक्काम करून आज सकाळी या पालखीने शेगावकडे प्रस्थान केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami