इस्लामाबाद – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात २३ प्रवाशांनी भरलेली एक प्रवासी व्हॅन १०० फूट खोल दरीत कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक बालक गंभीर आहे. झोब राष्ट्रीय महामार्गावरील किल्ला सैफुल्ला परिसरात हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी २३ जणांसह ही व्हॅन लोरलाईहून झोबकडे निघाली होती. त्यावेळी अचानक व्हॅन दरीत कोसळली. यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला, तर जखमी बालकाला क्वेटा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, मृतांमध्ये ५ मुले, ५ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केले.