संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

पाकिस्तानात पुराचे अस्मानी संकट! महिन्यात ३१४ नागरिकांचा बळी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इस्लामाबाद- निम्म्या भारतात दुष्काळासारखी स्थिती असली तरी पाकिस्तानमध्ये मात्र अफाट पावसामुळे बिकट परिस्थिती उद्भवली आहे. मुसळधार पावसाने देशातील सर्व नद्यांना पूर आला असून महिनाभरात साधारण ३१४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १० हजार लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. पुराचा फटका सुमारे ७ लाख लोकांना बसला असल्याने १० जिल्ह्यात हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

देशातील सर्वच राज्यांत पुराचे अस्मानी संकट आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.पुराचा फटका ७ लाख ५२ हजार नागरिकांना बसला आहे, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.पुरामुळे दक्षिण-पश्चिम प्रांतात बलुचिस्तानमध्ये सर्वाधिक १११ जणांचे मृत्यू झाले आहेत. सध्या कराची, पंजाब प्रांत -सिंध प्रांतात देखील गंभीर परिस्थिती आहे.लष्कर, एनजीआे व इतर संस्थांच्या मदतीने पीडितांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु पाऊस सतत राहिल्यास देशाची स्थिती आणखीनच वाईट होईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

आतापर्यंत खैबर पख्तुनख्वा-५९, पंजाब-२२, पाकव्याप्त काश्मीर-१०, बलुचिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे झालेल्या अनेक दुर्घटनांत किमान ६१ नागरिक जखमी झाले आहेत. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये अनुक्रमे २६ आणि २४ नागरिकांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात सुरू झालेल्या पावसाने पाकिस्तानातील अनेक भागात धुमशान घातल्याचे पाहायला मिळू लागले आहे. पाकिस्तान सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेशी काळजी घेतल्याचे दिसून येते.१७५ हून अधिक गावांना पुराचा वेढा दिला आहे. तर ४ लाख ५० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.२ हजार ७४७ घरांचे विविध राज्यांत नुकसान २ हजार सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. देशातील १६ बंधाऱ्यांच्या भिंतीला तडे गेले आहेत. गेल्या आठवड्यात सिंध प्रांतात पावसामुळे अनेक गावांत २ हजार २७५ नागरिक अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी नौदलाने ऑपरेशन यशस्वीपणे राबवले होते. त्यामुळे नागरिक सुरक्षित स्थळी पोहोचले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami