कराची – पाकिस्तानात महागाईचा आगडोंब सुरूच आहे. तिथे पेट्रोल, डिझेल, रॉकेलच्या किंमतीत प्रति लिटर ३० पाकिस्तानी रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याची माहिती पाकिस्तानी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी दिली. ६ दिवसांपूर्वीच पाकिस्तानी सरकारने इंधन दरात ३० रुपयांनी वाढ केली होती. कर्ज घेण्यासाठी आपल्याला आयएमएफच्या अटीही पूर्ण कराव्या लागतात आणि सरकारकडे याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मिफ्ताह इस्माईल यांनी सांगितले.
पेट्रोल : २०९.८६, डिझेल : २०४.१५, रॉकेल : १८१.९४. लाइट डिझेल : १७८.३१ रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच पाकिस्तानात एका युनिटच्या विजेसाठी २४.८२ रुपये मोजावे लागणार आहेत. नॅशनल इलेक्ट्रिक पॉवर रेग्युलेटरी अथॉरिटीनेदेखील पुढील महिन्यापासून वीज ७.९१ रुपये प्रति युनिटने महाग केली जात असल्याचे जाहीर केले आहे. मिफ्ता इस्माईल म्हणाल्या की, गेल्या इम्रान सरकारने देशाच्या तिजोरीत एकही पैसा शिल्लक ठेवला नाही. त्यामुळे इच्छा नसतानाही कठोर पावले उचलावी लागत आहेत.