संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

पाचगणीत ढगफुटी सदृश्य पाऊसरस्त्याची बनली नदी,दुकाने तुडुंब

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पाचगणी- सातारा जिल्ह्यातील पाचगणीत गुरुवारी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला.या पावसाने बिलिमोरिया रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले तर परिसरातील दुकानात पाणी शिरल्याने दुकानदार आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.

मागील दोन दिवसापासून वातावरणात अचानक बदल झाला होता.दिवसभर आकाश निरभ्र होवून संध्याकाळी आकाशात ढगांची दाटी झाली आणि अचानक पाऊस कोसळायला सुरुवात झाली. रात्रीच्या सुमारास तर अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.त्यामुळे बिलीमोरिया रस्त्यावर पाण्याचे लोट वाहिल्याने नदीचे स्वरूप आले होते. हे पाणी अनेकांच्या दुकानात घुसल्याने व्यावसायिकांनी तारांबळ उडाली होती.टेबल पठारावरून पाण्याचे लोट वाहत होते.तर,संपूर्ण रस्ते जलमय झाले होते.

हे पाणी बिलिमोरीया रस्त्यावर असणाऱ्या फ्रेंड्स मार्केटिंग,राजू भंडारी,सम्राट, करंजकर स्टोअर्स,जाधव स्टोअर,अपना हॉटेल, कलारंग शॉपी आदी दुकाने पाण्यात बुडाली.दुकानातील सर्व सामान भिजले. दुकानातील पाणी काढताना दुकानदारांची दमछाक होत होती.पाचगणीमध्ये टेबल पठारावरून पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याची समस्या नित्याची आहे.त्यामुळे प्रत्येक मोठ्या पाऊसात बिलीमोरीया रस्त्यावर अनेकदा पाणी येते. हे पाणी दुकानामध्ये शिरतेच तर नगरपरिषदेच्या माध्यमातून या येणाऱ्या पाण्याची समस्या दूर करण्याचे सुरूच आहे.त्याकरिता भूमिगत पाईप टाकण्यात काम सद्य परिस्थितीमध्ये सुरू आहे.ते अर्धवट स्थितीत राहिल्याने ही समस्या उद्भवल्याने आता हे काम ठेकेदाराने त्वरित पूर्ण करण्याची मागणी व्यापारी आणि शहरवासीयांनी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami