सातारा – जिल्ह्यातील पाटण तालुक्याच्या काेयना परिसरात भूकंपाचा साैम्य धक्का बसला आहे. आज दुपारी काेयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची चर्चा हाेती. याबाबत काेयना धरण व्यववस्थापनाने नुकताच दुजाेरा दिला. ही घटना आज शुक्रवारी दुपारी एक वाजता घडली.
या भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण तालुक्यातील कोयना धरणापासून १२ किलोमीटर अंतरावर आणि हेळवाकच्या नैऋत्येला ७ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपामुळे काेणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही.