नाशिक – पावसामुळे भाज्यांचे पीक वाया गेल्याने नाशिकमध्ये आज भाज्यांचे भाव कडाडले. त्यात कोथिंबीर आणि मेथी ६० रुपये जुडी विकली जात होती.
नाशिक आणि परिसरात पडत असलेल्या पावसामुळे भाज्यांचे पीक वाया गेले आहे. या पावसाचा तडाखा कोथिंबिरीलाही बसला. परिणामी सर्वच पालेभाज्या महागल्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या घाऊक भाजी बाजारात मेथी आणि कोथिंबीर ६० रुपये जुडी प्रमाणे विकली जात होती.