संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

पीओपीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : यंदा गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक असल्याचे पालिकेने सांगितले आहे.‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेश मूर्तींमुळे समुद्रातील पाण्यात प्रदूषण होते. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन केंद्रीय प्रदूषण मंडळानेपर्यावरणाला घातक अशा ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवर बंदी घालणारा कायदा केला आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२३ च्या गणेशोत्सवापासून मुंबईत ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेश मूर्त्यांवर पूर्णतः प्रतिबंध असणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर ती मूर्ती पीओपीची असल्याचे नमूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे विसर्जन व्यवस्थेत असणाऱ्याना प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती ओळखणे सुलभ होईल. या मूर्त्यांचे सार्वजनिक ठिकाणी विसर्जन न करता त्यांचे कृत्रीम तलावात विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करून समुद्र, तलाव आदी नैसर्गिक स्रोतांमध्ये केवळ शाडूच्या गणेशमूर्तीचेच विसर्जन करण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान घरगुती श्री गणेश मूर्तींची उंची ही २ फुटांपेक्षा अधिक नसावी,तर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांसाठीच्या श्री गणेश मूर्तींची उंची ही शक्य तेवढी कमी असावी असे पालिकेने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami