संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 13 August 2022

पीसीबीने केले राष्ट्रीय प्रशिक्षकाला निलंबित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इस्लामाबाद- महिला खेळाडूचे शोषण केल्याच्या आरोपावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने(पीसीबी) त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकाला निलंबित केले. मुल्तान भागातील नदीम इक्बाल असे या कोचचे नाव असून तो एक प्रसिद्ध माजी वेगवान गोलंदाज होता. ज्या संघाकडून वकार युनिस खेळायचा त्याच संघाकडून नदीमने देखील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

पीसीबी अधिकार्‍यांनी सांगितले की, आम्ही कोणतीही फौजदारी चौकशी करू शकत नाही ते पोलिसांचे काम आहे. मात्र आम्ही केलेल्या चौकशीत नदीमने बोर्डाच्या कराराचा भंग केल्याचे आढळून आले आहे. 50 वर्षाच्या नदीमने 80 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेट वर्तुळात वकारपेक्षा नदीम चांगला गोलंदाज असल्याचे मानले जात होते. त्याने कराची येथील एका सामन्यात नॅशनल बँकेच्या संघाला 20 धावांत गाशा गुंडळायला लावला होता. त्यावेळी त्याने सात विकेट घेतल्या होत्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami