पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस सोमवारपासून पुन्हा धावणार

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

पुणे- कोरोनामुळे स्थगित केलेली पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस सोमवार 18 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे पुणे-मुंबई-पुणे दरम्यान दररोज ये-जा करणार्‍या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कोरोनामुळे मार्च महिन्यात रेल्वेने नियमित सेवा स्थगित केली होती. टप्प्याटप्प्याने विविध मार्गांवरील सेवा सुरू झाल्या. मात्र, सिंहगड एक्स्प्रेस अजूनही होती. अखेर सिंहगड एक्स्प्रेसला पुन्हा एकदा ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सोमवार 18 ऑक्टोबरपासून पुण्याहून रोज सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी रेल्वे सुटणार असून, 9 वाजून 55 मिनिटांनी सीएसएमटी (मुंबई) येथे पोहोचणार आहे. तर सीएसएमटी येथून सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी एक्स्प्रेस सुटणार असून, रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पुण्यात पोहोचणार आहे. ही रेल्वे दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, चिंचवड, पिंपरी, खडकी आणि शिवाजीनगर येथे थांबणार आहे.

Close Bitnami banner
Bitnami