संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया १५ जूनपासून

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील अनेक विद्यापीठांमार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येते. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर प्रवेशांची प्रक्रिया येत्या १५ जूनपासून सुरू होणार आहे. याबाबतचे सविस्तर माहितीपत्रक एक ते दोन दिवसांत विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत. या अर्जांची पडताळणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आणि प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध होणार आहे. पुणे विद्यापीठाची अंतिम वर्षाची सत्र परीक्षा लक्षात घेता ही परीक्षा २१ ते २३ जुलै या कालावधीत होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

पुणे विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले असून पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी साधारण अडीच हजार जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांचे शुल्क इतर खासगी विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी अर्ज करतात. मागील वर्षी ३० हजारांपेक्षा अधिक अर्ज आले होते, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान,

पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये १३ पदवी अभ्यासक्रम सुरू असून त्यासाठीची परीक्षा केवळ एक दिवस असणार आहे. तर, इतर दिवशी पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा विविध सत्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. विशेष म्हणजे मागील तीन वर्ष विद्यापीठाकडून परीक्षा झाल्यावर तातडीने निकाल जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वेळेत प्रवेश होऊन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. आता यंदाही विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया कमी कालावधीत पूर्ण करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami