पुणे – कात्रज-देहूरोड बाह्यमार्गावर कात्रजकडून नवले पुलाकडे जाणार्या मार्गावर शिवसृष्टीसमोर रेडिमिक्स सिमेंटचा मिक्सर पलटी झाल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात 2 जण जखमी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा मिक्सर चारचाकी वाहनावर पलटी झाला. त्यामुळे या वाहनाचे मोठे नुकसान झाले. मारुती पवार (50) व माधुरी पवार (रा. नांदेडसिटी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. सकाळची वेळ असल्याने या अपघातामुळे वाहतूककोंडीदेखील झाली होती. भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

पुण्याच्या नवले पुलाजवळ सिमेंटचा मिक्सर पलटी
- Published on June 15, 2022
- 2:06 pm


- टॅग्स :
- Accident, maharashtra, pune
