संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

पुण्याच्या भुयारी मेट्रोच्या दुहेरी बोगद्यांचे काम पूर्ण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- पुणेकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातील भुयारी मेट्रोच्या दोन्ही बोगद्यांचं काम अखेर पूर्ण झाले आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मेट्रो प्रकल्पातील प्रत्येकी ६ किलोमीटर लांबीच्या दुहेरी भुयारी मार्गांचे काम शनिवारी पूर्ण झाले असल्याची माहिती समोर आली असून, येत्या ९ महिन्यांत कसबा पेठ स्थानकाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पात एकूण ३३.२ किमी लांबीचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक वनाज ते रामवाडी आणि दुसरा पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गात कृषी महाविद्यालय ते स्वारगेट असा सहा किलोमीटरचा भुमीगत मार्ग आहे. या मार्गात शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी भुमीगत मेट्रो स्थानके आहेत. भुयारी मार्गात अप आणि डाऊन मेट्रो ट्रेनसाठी दोन समांतर बोगद्यांचा समावेश आहे. दोन बोगद्याच्या १२ किमी कामांसाठी तीन टीबीएम मशीनचा वापर करण्यात आला आहे. त्यातील दुसऱ्या बोगद्याचे काम काल पूर्ण झालं. शिवाजीनगर ते कसबा पेठ आणि स्वारगेट ते कसबा पेठ हे दोन्ही बोगदे परस्परांना जोडले गेले. टाटा- गुलेरमार्ग कंपनीकडून या दोन्ही बोगद्यांचे आणि स्थानकांचे काम अद्याप सुरू आहे. ५ सप्टेंबर २०२१मध्ये या कामाला सुरुवात झाली होेती. आता हे काम पूर्ण झाल्यावर कामगारांनी तिरंग्यासोबत फोटो घेत काम पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami