संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

पुण्यातील भाजपाचा पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंचा डुप्लिकेट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या पुणे दौर्‍यावर येणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच पुणे दौरा असणार आहे. या दौर्‍यात ते फुटबॉल मैदानाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरतीही करणार आहेत. दरम्यान, शिंदे यांच्या पुणे दौर्‍याआधीच पुण्यात त्यांचे डुप्लिकेट अवतरले आहेत. या डुप्लिकेट शिंदेंना बघून पुणेकरांना जणू एकनाथ शिंदेच आलेत का? असा भास पुणेकरांना झाला. विशेष म्हणजे माने हे भाजपच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. पुण्यात एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसणारे एक व्यक्ती आहेत. विजयराजे माने असे त्यांचे नाव. विजयराजे माने हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखेच दिसतात. माने यांनी चेहर्‍यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा आणि ते परिधान करत असलेले व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट आणि ते वापरत असलेला एकनाथ शिंदे यांच्यासारखाच चष्मा सगळ्यांमुळे माने हे शिंदे यांचे डुप्लिकेट दिसतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami