संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुलवामा – दक्षिण काश्मीरच्या पुलवामातील गोंगू क्रॉसिंग परिसरात रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात एएसआय विनोद कुमार शहीद झाले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जोरदार मोर्चेबांधणी करत दहशतवाद्यांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले.

रविवारी दुपारी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील गोंगू क्रॉसिंगजवळील गोलाकार रस्त्यावर पोलीस आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक तपासणीत गुंतले होते. त्यावेळी तेथील सफरचंदाच्या बागेतून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यादरम्यान सीआरपीएफचे एएसआय विनोद कुमार गंभीर जखमी झाले. जखमी विनोद कुमारना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami